कोहिनूर

विकिपिडिया नं

कोहिनूर सिक्क थिकेयागु हिरा खः।

थ्व हिरा हाकुगु भारतीय हेरायागु नामं लोकंह्वाअगु दु। साधारणपणे अठराव्या शतकापर्यन्त हिरे जगात फक्त भारतातच मिळत असत. हे सर्व हिरे भारतीय राजा-महाराजांच्या खजिन्यात असत. पण सध्या हे सर्व प्रसिध्द हिरे परदेशात असल्याचे दिसते.

कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किवा खरेदी केला नाही. मात्र त्याने कितीतरी मालक बदलले. कोहिनूरचा इतिहास हा खून, लढाया, सत्ता व शोकांतिकांचा इतिहास आहे.

काही सुत्रांनुसार कोहिनूर सुरुवतीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. सुमारे चार हजार वर्षांपुर्वी तो गोवळकोण्डा येथील खाणीत सापडला असावा. एका कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजीत राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी. सत्राजीताचा भाउ प्रसेन हा घेउन शिकारीला गेला. तिथे एका सिंहाने त्याला मारून मणी नेला. पुढे जाम्बुवंताने सिंहाला मारुन मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला श्रीकृष्णावर. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेउन पुढे जाम्बुवंताशी युध्द केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाउन मणी व आपली कन्या जाम्बुवंती अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजीतास परत केला. पुढे सत्राजीताची मुलगी सत्यभामा हीच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होवुन श्रीकृष्णाला स्यमंतक मणी परत हुंडा म्हणुन मिळाला. तेव्हा श्रीकृष्णाने तो सूर्यास परत केला असे म्हणतात.

त्यानंतर १६ व्या शतकामधे बाबर राजाचा इतिहास, बाबरनामा (इ. सन १५२६ ते १५३०), यात याचा उल्लेख येतो. मे १५२६ मधे बाबर जेव्हा आगरा येथे आला, तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याने तो दिला असावा. पुढे तो बाबराचा मुलगा हुमायुन याच्याकडे गेला. पुढील २०० वर्षे तो बाबरचा हिरा म्हणुन ओळखला जात असे. काही सुत्रांनुसार ' द ग्रेट मुगल' आणि कोहिनूर हे हिरे एकच होत. पुढे हा हिरा मुगलांचे वारसदार शाहजहान व औरंगजेब यांच्याकडे गेला.

पर्शियाचा (सध्याचा इराण) नादिर शहा याने मुगलांची दिल्ली व आगरा लुटले तेव्हा तो त्यांचे मयूर सिंहासन व कोहिनूर घेउन परत गेला. पहिल्यांदा हा हिरा पाहिल्यावर नादिर शहा आश्चर्याने उद्गारला "कोह-इ-नूर" म्हणजे "प्रकाशाचा पर्वत". तेव्हापासुनच कोहिनूर हे नाव प्रचलित आहे.

पुढील ६० वर्षांचा कोहिनूरचा इतिहास रक्तलांछीतच आहे. शेवटी तो पंजाबचा महाराजा रणजीत सिंग व त्याचा मुलगा दलिप सिंग याच्याकडे गेला. इंग्रजांनी रणजीत सिंगाचा लाहोर येथे पराभव करुन कोहिनूर जिंकला व तो इतर रत्नांबरोबर लंडन येथे नेउन राणी व्हिक्टोरिया हिला नजर केला (इ.सन १८४९).

इ.सन १८५३ मधे राणीने त्याला पुन्हा पैलू पाडुन घेतले. यामुळे त्याची चकाकी वाढली तरी वजन मात्र १८० कॅरेट वरून १०५ कॅरेट एवढे कमी झाले. सध्या हा हिरा लंडन येथील राणीच्या खजिन्यात (लंडन टॉवर येथे) पहावयास मिळतो.

एकुणच असे म्हणतात की कोहिनूर पुरुषांना लाभत नाही. त्याच्या बहुतेक पुरुष मालकांचे दुःखद मृत्यु झाले आहेत. स्त्रियांना मात्र त्याचा फारसा त्रास झालेला नाही.

भारताने कोहिनूर परत मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले होते. १९४७ साली स्वातंत्र्यानंतर भारताची कोहिनूरची मागणी ब्रिटीशांनी धुडकावुन लावली होती. तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले होते, हिरे वगैरे राजा-महाराजांचा पोरकटपणा आहे. सध्या भारताला त्याची गरज नाही. पाकिस्तानचे हुकुमशहा जुल्फ़ीकार भुत्तो, इराणी सरकार, महाराजा रणजीत सिंगाचे सध्याचे वारसदार यांनीही मग कोहिनूर साठी ब्रिटीशांकडे प्रतीदावे करून भारताच्या मागणीत अडसर निर्माण केला. अर्थात काही मतांप्रमाणे हे सर्व प्रतीदावे ब्रिटीशांनीच फूस लावल्यामुळे करण्यात आले होते, जेणेकरून ब्रिटीशांना कोहिनूर चे स्वमित्व नक्की करता येत नसल्याचे कारण पुढे करून तो स्वतःकडेच ठेवता आला. त्यांच्या फोडा आणि राज्य करा नीतीचा हा आणखी एक नमुना.


अजुनही कोहिनूर भारताला परत करण्याबद्दल वावड्या उठतच असतात. ओरीसा, जगन्नाथपुरी येथील मंदिराच्या दाव्याप्रमाणे, कोहिनूर जगन्नाथालाच (श्रीकृष्णाला) परत करण्यात यावा व जगन्नाथाच्या पायावरच तो विराजमान झालेला सगळ्यांना दिसावा हाच सर्वोत्तम पर्याय आहे. अशारीतीने कोहिनूरचा श्रीकृष्णापासुन श्रीकृष्णापर्यंत एक वर्तुळाकार प्रवास पूर्ण होईल.

आजपर्यंत कोहिनूरच्या मालकांची यादी[सम्पादन]

इतिहासपूर्व काळ - सत्राजीत, जांबुवंत, श्रीकृष्ण

१२वे शतक - काकतिया राजे (प्रताप रुद्र)
१२९४ - मालव्याचा राजा
१३२३ - मोहंमद-बिन-तुघलक
१५२६ - बाबर
१७३९ पर्यंत - मुगल सुलतान - हुमायुन, शाहजहान, औरंगजेब
१७३९ - नादिर शहा
१७४७ - अहमद-शहा-अब्दाली (अफ़गाणिस्तान)
१८१३ - रणजीत सिंग (पंजाब)
१८४९ - महाराणी व्हिक्टोरिया
१८४९ ते आजपर्यंत - ब्रिटीश राजघराणे